स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 56
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आसन स्थान (श्रीचक्रधर मंदिर १)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
श्रीचक्रधरप्रभू मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्या मंदिरात पश्चिम बाजूस लगतच श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केलेली आहे. हे एक स्थान आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एखाद्या वेळेस येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (उ. ली. १२३, स्था. पो.) २) मासोपवासिनींना दर्शन देणे. (स्था. पो. उ. प्र.) ३) इंद्रभट व अवधूत भेटी (स्था. पो. उ. प्र.) ४) मासोपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण. (उ. ली. १२३)