स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 63
निरूपण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
गांधीया हिवरू तस्वू:ख निरूपण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून ईशान्येस २८ फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
या ठिकाणी गाठ्याळ हिवराचे झाड होते. त्याला ठिकठिकाणी गाठी उगवल्या होत्या. सर्वज्ञ येथे आले. सोबत भटोबासही होते. सर्वज्ञ भटोबासांना म्हणाले, “अशी ही झाडांची दु:खे आहेत. वृक्ष योनी प्राप्त झाली असताही अवांतर दु:खाचा भोग चुकत नाही.” (उ. ली. ११६, स्था. पो.) तस्वू:ख निरूपण स्थानाच्या आग्नेयेचे स्थान निर्देशराहित आहे.