स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 65
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आसन स्थान (इंद्रभटांचा उपहार स्वीकार स्थानाच्या पश्चिमेस)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान इंद्रभटांचा उपहार स्वीकार स्थानाच्या पश्चिम बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे कधी कधी भक्तजनांना निरूपण करीत असत. (उ. ली. १८०, तळटीप, ना. प्र.) या व्यतिरिक्त या मंदिरातील इतर चार स्थाने निर्देशराहित आहेत.