मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 66 परमानंद प्रगट डोमेग्राम (डोंबेग्राम)

विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीचक्रधरप्रभू मंदिराच्या पाठीमागे आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे घोगरगावच्या बाईचा विषयानंद दवडून तिच्या ठिकाणी परमानंद संचारला. (उ. ली. १०८, स्था. पो.) विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे स्थानापासून नैऋत्येस ८८ फूट अंतरावरली 'एकांकबार' नावाचे स्थान निर्देशराहित आहे. कोणी एक ईश्वरावतार या ठिकाणी बारा वर्षे राहिले अशी दंतकथा आहे.

जवळील इतर स्थाने