स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 67
पोहविणे
डोमेग्राम (डोंबेग्राम)
पुरामध्ये पोहविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान एकांकबार स्थानापासून वायव्येस सुमारे १५० फूट अंतरावर नदीच्या दक्षिण थडीवर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ विहरणासाठी आले. नदीच्या थडीवर येथे उभे राहिले. नदी पाण्याने दुथडी भरून वाहत होती. सर्वज्ञ, भटोबास व नाथोबांना म्हणाले, 'एवढ्या पुरातून तुम्ही पलीकडे जाऊ शकाल?' भटोबास, नाथोबा, 'हो' म्हणाले, सर्वज्ञांची अनुमती मिळताच लगेच दोघांनी कपडे काढले. सर्वज्ञांना दंडवत करून दोघांनी पुरामध्ये प्रवेश केला. (उ. ली. ९६, स्था. पो.)