मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 68 तारणे डोमेग्राम (डोंबेग्राम)

नाथोबा तारणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पुरामध्ये पोहविणे स्थानापासून पूर्वेस १४० फूट अंतरावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञांच्या आज्ञेवरून भटोबास व नाथोबा हे दोघे नदीच्या पुरामध्ये उड्या टाकून पोहत पोहत पलीकडच्या थडीकडे निघाले. थडीजवळ पोहचता पोहचता सर्वज्ञांनी त्यांना परत बोलविले. परत येताना मध्यपात्रात आल्यावर नाथोबा वाहून जाऊ लागले. नाथोबा वाहून चालले म्हणून बाइसा मोठ्याने ओरडू लागल्या. मग सर्वज्ञांनी फुटा फिरवला. लगेच नाथोबांनी ठाव घेतला. गुडघ्याएवढ्या पाण्यात उभे राहिले. नंतर भटोबास त्यांना घेऊन आले. (उ. ली. ९६, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने