स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 71
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
छिन्नस्थळी आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ढगाच्या स्थानाच्या खालील बाजूस (उत्तर बाजूस) नदीच्या पात्रात थडी लगत उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज येथे विहरणासाठी येत असत. त्यांना या ठिकाणी कधी पूर्वाभिमुख, कधी पश्चिमाभिमुख, कधी उत्तराभिमुख, कधी दक्षिणाभिमुख आसन होत असे. कधी संध्याकाळच्या वेळेस तर कधी एकटेच सर्वज्ञ येथे येत असत. (स्था. पो. उ. प्रत) डोंबेग्रामला अवस्थान असतानाही सर्वज्ञ येथे कधी कधी विहरणाला येत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) येथील इतर लीळा : (१) सारंगपंडित भेटी, देवगावच्या बाईची भेटी, रेइनायकांचा मुलगा नागोबा, त्याची भेटी, ज्वरनिवृत्ती झाल्यावर रेइनायक भेटी, ग्रहेसारंगपाणी व त्यांच्या मातेची भेटी, बाजाठाणीच्या महाजनांची भेटी, नाथोबा भेटी, इत्यादी भेटी छिन्नस्थळीवर झाल्या. (स्थान पोथी उ. प्रत) (२) भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करणे (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) (३) गुंफेत चाकवताची भाजी राधवल्यानंतर छिन्नस्थळीवर येऊन भक्तजनांसहित आरोगणा करणे. भक्तजनांना श्रीकराच्या करंगळीने भाजी वाढणे. (उत्तरार्ध लीळा १०५, स्थान पोथी उ. प्रत) (४) पुरप्रविष्ट स्त्री तारणे. (उत्तरार्ध लीळा ९७) (५) आऊ पिंड उपहार स्वीकार. (उत्तरार्ध लीळा ९९) (६) सारंगपंडिता स्त्री अधिकार निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १०२) (७) दायंबा सीखासुत्रत्याग अनुवाद (उत्तरार्ध लीळा ११३) (८) भट तुरंगमारोहणी छिन्नस्थळीपाशी उतरून आसन. (उत्तरार्ध लीळा १६६, स्थान पोथी)