स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 72
घाट छिन्नस्थळी
डोमेग्राम (डोंबेग्राम)
घाट छिन्नस्थळी
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन छिन्नस्थळीच्या पूर्व बाजूस शेजारीच आहे. घाट छिन्नस्थळी हा छिन्नस्थळीचाच अविभाज्य विभाग होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
घाट छिन्नस्थळी म्हणजे सर्वज्ञांचा छिन्नस्थळीकडे येण्याचा मार्ग होय. या बाजूने सर्वज्ञ येत असत. मग त्यांना छिन्नस्थळीवर आसन होते असे. (स्था. पो.)