स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 73
तरूनिरूपण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
दायंबा, आधड तरूनिरूपण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन छिन्नस्थळी स्थानापासून पश्चिमेस २७ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ दायंबा मुख्यकरून सर्व भक्तजनांसह छिन्नस्थळीकडे विहरणाला आले. सर्वज्ञ येथे उभे राहिले. तेव्हा उतारावर एक पिंपळाचा वृक्ष वाऱ्यामुळे हालत होता. आदळत होता. तो वृक्ष एकाच मुळीवर राहिला होता. तो अवलोकून सर्वज्ञ दायंबांना म्हणाले, "तुम्ही येथे अनुसरा म्हणजे तुमचे सर्व दुःख चुकतील. नाहीत तर तुम्हाला अशा प्रकारच्या वृक्ष योनीत जन्म घेऊन अनेक काळ दुःख भोगावे लागेल." परंतु दायंबा गप्पच होते. काहीच बोलले नाही. (उ. ली. ११२, स्था. पो.)