स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 75
भांडेभेदन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
भांडेभेदन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जळसेनी आसन स्थानापासून पश्चिमेस २८७ फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ बाइसांना म्हणाले, "आज आम्ही महात्म्यांचे भिक्षाच भोजन करू, तुम्ही आज काही करू नका." मग सर्वज्ञ भांडेभेदनाकडे आले. त्यांना येथे आसन झाले. गुंफेहून निघताना बाइसांनी माहादाइसांना हळूच निरोप दिला की, 'भिक्षेला काही व्यवस्थित पदार्थ येणार नाहीत, तरी येताना तांदळाचा भात करू घेऊन ये.' माहादाइसांनी भात तयार केला. वस्त्राखाली झाकून घेऊन येत होत्या. तेव्हा सर्वज्ञांनी खडा फेकून मारला. त्याचबरोबर भाताच्या मडक्याच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या. सर्व भात खाली सांडला. बाइसा म्हणाल्या, 'कटकट बाबा, सगळा भात वाया गेला.' सर्वज्ञ म्हणाले, "आम्ही तुम्हाला नको म्हणून सांगितले असता, तुम्ही का ऐकले नाही?" मग भक्तजन भिक्षा करून आले. सर्वज्ञांना झोळ्या दृष्टपूत केल्या. बाइसांनी भिक्षेतील चांगले पदार्थ निवडले. मग सर्वज्ञांनी भक्तजनांसहित आरोगणा केली. (उ. ली. १०१, स्था. पो.) येथे सर्वज्ञांना पूर्वाभिमुख आसन होत असे. कदाचित पश्चिमाभिमुख आसन होत असे. भक्तजनांची भोजनता येथेच होती. (स्था. पो. उ. प्र.)