स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 76
पाषाण फोडविणे
डोमेग्राम (डोंबेग्राम)
पाषाण फोडविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भांडेभेदन स्थानापासून नैऋत्येस २९ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे डोंबेग्राम येथे वास्तव्य असताना ते गोदावरीच्या काठी विहरणासाठी येत असत. त्याप्रसंगी भक्तजनांचा कर्मनाश होऊन त्यांचा अधिकार वाढावा, त्यांना योग्यता व्हावी, या उद्देशाने सर्वज्ञ त्यांच्याकडून पाषाण फोडवून घेत असत. त्या वेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर, स्था. पो.)