स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 78
देवतापूजा स्वीकार
डोमेग्राम (डोंबेग्राम)
देवद्रोगी, देवतापूजा स्वीकार स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महालक्ष्मीचा साजा आसन स्थानापासून पश्चिमेस सुमारे २०० फूट अंतरावर (नांगर चासाच्या काठी) देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञांना छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहुड झाल्यावर ते एकटेच देवद्रोणीकडे आले. त्यांना येथे आसन झाले. तेव्हा पाण्यातून सोन्याच्या ताटात रत्नांचे दीप घेऊन दोन देवता आल्या. त्यांनी सर्वज्ञांची पूजा केली. दंडवत घालून नमस्कार करून मग गेल्या. (उ. ली. १००, स्था. पो.) येथून देवगाव स्थान क्रमांक ४ कडेही जाता येते .