स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती स्थान
जामगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जामगाव, अहिल्यानगरहून नैऋत्येस २७ कि.मी. आहे व लोणीहून उत्तरेस ६ कि.मी. आहे. पारनेर ते जामगाव ११ कि.मी. आहे. जामगावला जाण्यासाठी अहिल्यानगर, लोणी व पारनेर येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
जामगावच्या वायव्येस गावालगतच ओढ्याच्या पश्चिम काठावर सिंगेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी असून त्यावर शहाबादी फरशी बसविलेली आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्थ काळात लोणीहून जामगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ.ली. २८९, स्था. पो.) त्यानंतर ते येथून नागापूरला गेले.