स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
आसन
देवगाव
देवळाच्या चौकातील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मराठी शाळेच्या आग्नेयेस गोदावरी नदीच्या उत्तर काठी महादेवाच्या पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
डोंबेग्रामी अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणासाठी देवगावला आले. सोबत आउसा मुख्यकरून सर्व भक्तजन होते. या देवळाच्या चौकात सर्वज्ञांना आसन झाले. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, "ज्या वेळी या देवळाचे उद्यापन झाले. त्या वेळी आम्ही येथे पत्रावळी टाकून जेवण केले होते." (उ.ली. २११, स्था.पो.)