मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

देवगाव · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 4 नामकरण देवगाव

पंचगंगा नामकरण स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवद्रोगी, देवतापूजा स्वीकार स्थानाच्या वायव्येस अंदाजे ५० मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी देवगाव रस्त्याच्या कडेला दक्षिणाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: वैजापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
देवगावचा एक ब्राह्मण, त्याच्या पाचही मुली विधवा होत्या; म्हणून सर्व लोक त्याला पंचरांडा आला, पंचरांडा गेला असे म्हणत. त्यामुळे तो ब्राह्मण फार दुःखी होता. एक दिवशी या देवळाच्या चौकात सर्वज्ञांना आसन असताना तो ब्राह्मण सर्वज्ञांच्या दर्शनाला आला. सर्वज्ञ म्हणाले, "भटो तुमच्या पंचगंगा निकेन असत?" हे शब्द ऐकताच ब्राह्मण म्हणाला, "जी जी निवालो. असे आजपर्यंत मला कुणीच म्हणत नव्हते. पंचरांडा या शब्दानेच सर्वजण मला संबोधित असत." मग त्याने सर्वज्ञांना दंडवत घातले. थोडा वेळ सर्वज्ञांच्याजवळ होते. नंतर गेले. (उ.ली. १०७, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने