स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
खोकर
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खोकर हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील खोकर फाट्यापासून दक्षिणेस सव्वा कि.मी. आहे. श्रीरामपूर ते खोकर फाटा ९ कि.मी. नेवासा ते खोकर फाटा २३ कि.मी. भोकर ते खोकर फाटा २ कि.मी. भोकरहून नैऋत्येस खोकर पायमार्गे ३ कि.मी. आहे. खोकरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खोकर गावाच्या वायव्य विभागी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उमारतीजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'महानुभाव श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू बेलापूरहून उत्तरापंथे जाताना येथे आले. गावातल्या लोकांनी कणीक, तांदूळ, तूप इत्यादी पदार्थ आणून दिले. मग भटोबासांनी स्वयंपाक केला. सर्वज्ञांना आरोगणा दिली. नंतर सर्वज्ञांनी येथे निद्रा घेतली. सकाळी उठून उत्तरापंथे प्रयाण केले. (उ. ली. ६५०, स्था. पो. उ. को. प्रत)