स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
आसन
टाकळीभान
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
टाकळीभान हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावर श्रीरामपूरहून पूर्वेस १४ कि.मी. आहे व नेवाशाहून वायव्येस १८ कि.मी. आहे. खोकर ते टाकळी पायमार्गे ५ कि.मी. आहे. खोकरफाटा ते टाकळी ५ कि.मी. आहे. टाकळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान टाकळी गावाच्या आग्नेयेस अंदाजे २०० मीटर अंतरावर श्री. पांडुरंग पाटील कापसे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सराळ्याहून टाकळीला आले. त्यांच्या वेळी येथे रानमळा होता. पिंपळाची व निंबोणीची दाट झाडे होती. येथे सर्वज्ञांना आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग त्यांनी थोडा वेळ निद्रा घेतली. उठल्यावर पुन्हा गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. नंतर ते येथून नेवासाला गेले. (उ.ली. २१४, स्था.पो.उ.प्रत) २) टाकटीस तुपाचा डो विसरणे. (उ.ली.)