मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बगडी · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वस्ती बगडी

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जुन्या ममदापूरहून पूर्वेस जुनी बगडी ६ कि.मी. आहे, व नव्या बगडीहून दक्षिणेस जुनी बगडी ३ कि.मी. आहे. नव्या बगडीपर्यंत जाण्यासाठी गंगापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या ओसाड बगडी गावाच्या दक्षिण विभागी देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मठ होता. त्या मठातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात व उत्तरार्ध काळात असे एकूण दोन वेळा बगडी येथे आले. पूर्वार्ध काळात ते कानडगावहून बगडीला आले. (पू. ली. ३८७ ख. प्र.) व उत्तरार्ध काळात जामगावहून बगडीला आले. (उ. ली. २४५ ख. प्र. स्था. पो. उ. को. प्र) दोन्हीही वेळेस त्यांचे या ठिकाणी एक-एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून जामगावला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून ममदापूरला गेले.

जवळील इतर स्थाने