मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

जामगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वस्ती जामगाव

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जुने जामगाव, गंगापूर साखर कारखान्यापासून दक्षिणेस २ कि.मी. आहे. गंगापूर ते गंगापूर साखर कारखाना ५ कि.मी. आहे. कारखान्यापर्यंत जाण्यासाठी गंगापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जुन्या बगडीहून जुने जामगाव (नवी बगडी, गंगापूर साखर कारखाना मार्गे ) ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गंगापूर साखर कारखान्याच्या दक्षिणेस २ कि.मी. अंतरावर जुन्या ओसाड जामगावच्या पश्चिम विभागी गद्दीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सिंगेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस डोंबेग्रामहून जामगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते, (पू. ली. ३०२ ख. प्र.) व दुसऱ्या वेळेस बगडीहून जामगावला आले. त्यावेळीही त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ३८८ ख. प्र.) आणि उत्तरार्ध काळात गावजोगेश्वरीहून जामगावला आले. त्यावेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. (उ. ली. २४४ ख. प्र., स्था, पो.) पूर्वार्ध पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून देवळाण्याला गेले. व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून गंगापूरला गेले. आणि उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून बगडीला गेले.

जवळील इतर स्थाने