स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
गंगापूर
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गंगापूर हे गाव, अहिल्यानगर-संभाजीनगरमार्गावरील कायगावपासून किंचित वायव्येस ८ कि.मी. आहे. १) संभाजीनगरते गंगापूर ४३ कि.मी. २) अहिल्यानगर ते गंगापूर ८० कि.मी. ३) नेवासा ते गंगापूर २४ कि.मी. ४) जुने जामगाव ते गंगापूर ७ कि.मी. गंगापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
गंगापूर गावाच्या ईशान्येस दर्श आहे. त्या दर्शाच्या ईशान्येस अंदाजे १०० मीटर अंतरावर वीजेच्या खांबापासून आग्नेयेस १३ फूट अंतरावर हे स्थान आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जामगावहून गंगापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ३८९ ख प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून फुलशिवर्याला गेले.