स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
गळनिंब (उत्तर)
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर संभाजीनगर-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे, येथे जावे. तेथून गळनिंब लिफटकडे जावे. लिफटचा रस्ता विचारून घ्यावा. लिफटजवळ स्थान आहे. हे अंतर १० कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गळनिंब लिफटच्याजवळ, देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात टोकेगव्हाणहून गळनिंबला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ३११, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून दक्षिण गळनिंबला गेले.