मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

अरणगाव · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 7 अवस्थान अरणगाव

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान लघु परिश्रम स्थानापासून उत्तरेस ६४ फूट ६ इंच अंतरावर ओहळाच्या पलीकडे आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुरवाची गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात मांडवगणहून अरणगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी १५ दिवस वास्तव्य होते. (पू. ली. १५७, तू. प्र. स्था. पो.) व उत्तरार्ध काळात नारायणडोहहून अरणगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक महिना वास्तव्य होते. (उ. ली. २७६, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) उपासनीयां लाठी घालणे. (पू. ली. १५९ तू.प्र.) २) देमती अद्रकत्त्वाच्याशी शिक्षापण. (पू. ली. ३५४) पूर्वार्धातील १५ दिवसांच्या वास्तव्यानंतर व उत्तरार्धातील एक महिन्याच्या वास्तव्यानंतर दोन्हीही वेळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येथून भिंगारला गेले .

जवळील इतर स्थाने