स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
आसन
सावखेडा (खडकुली)
संगमेश्वरी आसन स्थान (१)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सावखेडा हे गाव अहिल्यानगर-संभाजीनगरमार्गावरील ढोरेगावपासून पूर्वेस १४ कि.मी. आहे. सावखेडा गावापासून आग्नेयेस ६ कि.मी. अंतरावर पैठण धरणातील बेटावर खडकुलीची स्थाने आहेत. सावखेड्यापासून आग्नेयेस ४ कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रम आहे. संभाजीनगरते ढोरेगाव ३० कि.मी. आहे व नेवासा ते ढोरेगाव २५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खडकुली येथील बेटावर उत्तराभिमुख देवळात आहे. बेटावर जाण्यासाठी दीड कि.मी. नावेतून जलविहार करावा लागतो. (हा तिसरा संगमेश्वर होय.)
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे खडकुली येथे वास्तव्य असताना ते येथे विहरणासाठी येत असत.