मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नेवासा · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 अवस्थान नेवासा

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नेवासा हे गाव, अहिल्यानगर-संभाजीनगरमार्गावरील नेवासा फाट्यापासून वायव्येस ५ कि.मी. आहे. १) अहिल्यानगर ते नेवासा ५८ कि.मी. २) संभाजीनगरते नेवासा ५८ कि.मी. ३) शेवगाव ते नेवासा ४० कि.मी. ४) गंगापूर ते नेवासा २४ कि.मी. ५) श्रीरामपूर ते नेवासा ३२ कि.मी. नेवासा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ज्ञानेश्वर मंदिराच्या उत्तरेस अंदाजे ४०० मीटर अंतरावर लाडमोड टेकडी विभागात प्रवरा नदीच्या दक्षिण काठावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पुरादित्याचे देऊळ होते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून नेवाशाला आले. त्यांचे या ठिकाणी चार महिने वास्तव्य होते. (स्था. पो.) चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते येथून रांजणगावला गेले. येथील इतर लीळा : १) गोळकहोडे भरां पराजयो करणे. (२. ली. २२५) २) पास निरूपण. (२. ली. २३६) ३) भटां होडे केळे खाववणे. (२. ली. २३९) ४) मार्कडाची लाडू चोरी प्रगट करणे. (२. ली. २४१) ५) अनो सीखा सूत्रत्याग प्रशंसा. (२. ली. २४५) ६) भटां केसतोडा पाणीकापड बांधवणे. (२. ली. २४६) ७) म्हाळसा दर्शना येणे. (२. ली. २४७) ८) भटोबासांना ज्ञान, भक्ती, वैराग्य निरूपणे. (२. ली. २५३) ९) प्रयाण अवस्वरी देवा दीनदान प्रश्न. (२. ली. २५५)

जवळील इतर स्थाने