स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वसती स्थान
घोगरगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
टाकळीभानहून ईशान्येस घोगरगाव ५ कि.मी. आहे व जुने घोगरगाव ७ कि.मी. आहे. जुने घोगरगावपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या घोगरगावच्या वायव्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठी महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात नंदीच्या डाव्या (दक्षिण) बाजूस आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात टाकळीहून नेवाशाला गेले व तेथून रात्री घोगरगावला आले. गावाबाहेर उभे राहून भक्तजनांना सुनेभुंकी करायला लावली. त्यानंतर सर्वज्ञ येथे आले. या ठिकाणी पहुड झाला. सकाळी पूजावसर झाला. मग ते येथून डोंबेग्रामला गेले. (उ.ली. २१५, स्था.पो.)