स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
चापडगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चापडगाव, शेवगाव-गेवराई मार्गावर शेवगावहून पूर्वेस १५ कि.मी. आहे व गेवराईहून वायव्येस ४९ कि.मी. आहे. नेवासा ते चापडगाव ५५ कि.मी. चापडगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. वरखेडहून कुकाणा-शेवगावमार्गे चापडगावला जाता येते.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चापडगावच्या पूर्वेस अंदाजे १०० मीटर अंतरावर काटपाडी नदीच्या पश्चिम काठी श्री. शंकर हडके यांच्या शेतात सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पश्चिमाभिमुख देवळापुढे उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात घोटणहून चापडगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते (पू. ली. ३०६ ख प्रत) व उत्तरार्ध काळातही घोटणहूनच चापडगावला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. उत्तरार्धात येथे आउसांची व हंसराजांची भेट झाली. रात्री आरोगणा झाली. (उ. ली. ४२३ ख प्रत, स्था, पो.) पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून बोरीपिंपळगावला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून लाडजळगावला गेले.