मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

घोटण · शेवगाव · अहिल्यानगर

स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती घोटण

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घोटण हे गाव, शेवगाव-पैठण मार्गावर शेवगावहून ईशान्येस ११ कि.मी. आहे व पैठणहून नैऋत्येस १८ कि.मी. आहे. चापडगावहून वायव्येस घोटण पायमार्गे १० कि.मी. आहे. चापडगावहून घोटण (शेवगाव मार्गे) २६ कि.मी. आहे. घोटणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान घोटण गावाच्या पूर्वेस गावालगतच मळएगिरीच्या (महादेवाच्या) पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: शेवगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खिर्डीहून घोटणला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते (पू. ली. ३०५ ख प्र.) व उत्तरार्ध काळातही खिर्डीहूनच घोटणला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दोन्हीही वेळेच्या एक-एक दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून चापडगावला गेले.

जवळील इतर स्थाने