मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पैठण · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 पूजा स्वीकार पैठण

महादाश्रमाची यंत्रासनपूर्वक पूजा स्वीकार स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पैठण हे शहर, घोटणहून ईशान्येस १८ कि.मी. आहे. १) संभाजीनगरते पैठण ४९ कि.मी. २) जालना ते पैठण (अंबड, पाचोड मार्गे) ९० कि.मी. ३) शहागड ते पैठण ४१ कि.मी. ४) बीड ते पैठण ८५ कि.मी. ५) अहिल्यानगर ते पैठण ९६ कि.मी. ६) श्रीरामपूर ते पैठण १०२ कि.मी. पैठणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानालगतच महानुभाव आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानालगतच श्रीदत्तात्रेयप्रभूची मूर्ती बसविलेली आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास 'शास्त्रमठ' असे नाव होते. हा पाषाणाचा शास्त्रमठ होय. या मठाचे प्राचीनकाळचे दगडी १६ खांब अजूनही आहेत. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते. स्थानाच्या चारी बाजूचे खांब नमस्कारी आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूची काष्ठाच्या शास्त्रमठी संन्याशांच्या बरोबर चर्चा झाल्यापासून व त्यांना स्थित्यानंद दिल्यापासून सर्व संन्यासी सर्वज्ञांच्या कडे वेधले गेले. ते महादाश्रमाला माहीत न होता सर्वज्ञांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या तांबोळाचा प्रसाद घेऊ लागले. चरणोदक घेऊ लागले. ही गोष्ट महादाश्रमाला समजली. त्याला वाटले, हे श्रीचांगदेवराऊळ आमचा मार्ग उच्छेदित आहेत; म्हणून त्याने सर्वज्ञांना ओखटे करण्याच्या हेतूने पाषाणाच्या शास्त्रमठामध्ये रंगपूजा केली. यंत्रासन रचले. सर्व देवता आव्हानून उध्वमुखा केल्या. आपल्या शिष्याकडून सर्वज्ञांना बोलाविले. सर्वज्ञ येथे आले. 'येईजोजी येईजोजी' म्हणून महादाश्रम व त्याचे शिष्य उठून उभे राहिले. सर्वज्ञांनी येताच डाव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने आसन ढाळून उध्वमुखा देवता अधोमुखा केल्या. मग आसनावर बसले. नंतर महादाश्रमाने त्यांची पूजा केली. विडा अपर्ण केला. त्यानंतर सर्वज्ञ येथून निघून गेले. (उ. ली. ४७६, उ. ली. २९४ ख प्र.)

जवळील इतर स्थाने