मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पैठण · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 4 चरणचारी पैठण

पांड्याच्या गुंफेतील स्थान (उत्तर बाजू - चरणचारी उभे राहणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान तथा निद्रा स्थानापासून दक्षिणेस २४ फूट अंतरावर आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे पांड्याची उत्तराभिमुख गुंफा होती.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
लीळाचरित्राप्रमाणे येथे दोनच स्थाने घडतात; पण प्रत्यक्षात येथे तीन ओटे आहेत. उत्तर बाजूचे चरणचारी उभे राहणे स्थान व दक्षिण बाजूचे गुंफेतील आसन स्थान होय. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे सेवादास्य बाइसा आणि हंसराज करू लागल्यानंतर पांडा त्यांची निंदा करू लागला. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, "हा पांडा रोज निंदा करतो, तरी काय करावे?" सर्वज्ञ शांत होते. काहीच बोलले नाही. एके दिवशी रात्री पांड्याला स्वप्न पडले. स्वप्नात दोन यमदूत आले आणि म्हणाले, "अरे! हे द्वारावतीकार श्रीचांगदेवराऊळ, साक्षात ईश्वर अवतार आणि तू त्यांची निंदा करतोस!" असे म्हणून मुदगलाने ते पांड्याला मारायला धावत. तेव्हा सर्वज्ञ मध्ये आड येऊन त्यांना बाजूला करीत व म्हणत, "नका मारू त्याला, हा तसा नाही. याला जाणीव नाही. अज्ञान आहे." पुन्हा यमदूत मारायला धावत, पुन्हा सर्वज्ञ मध्ये जाऊन त्यांना निवारीत. असे रात्रभर पांड्याने स्वप्नात दुःख भोगले. सकाळी उठल्यावर बाइसांना मोठ्याने हाका मारू लागले. बाइसा आल्या. त्याने रात्रीची सर्व घटना बाइसांना सांगितली व सर्वज्ञांना येथे बोलावून आणण्याची बाइसांना विनंती केली. बाइसांच्या विनंतीस्वरूप सर्वज्ञ येथे आले. गुंफेच्या उंबरावर दोन्ही श्रीचरण ठेवून उभे राहिले. (हेच उत्तर बाजूचे स्थान) पांड्याने श्रीचरणावर डोके ठेवून नमस्कार केला. मग ओट्यावर आसन रचले. (दक्षिण बाजूचे स्थान) सर्वज्ञ आसनावर बसले. पांड्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. चरणोदक घेतले. (पू. ली. १०९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने