स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 7
आसन
पैठण
आसन स्थान (बाइसांचा ओटा)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
पश्चिम बाजूचा जो मोठा ओटा आहे, ते आसन स्थान होय. येथेच बाइसांचा बसण्याचा ओटा होता. प्रेमशक्ती संचारानंतर सर्वज्ञांना येथील ओट्यावर आसन होत असे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञांनी बाइसांना प्रेमशक्तीचा संचार केल्यानंतर बाइसांना सर्वज्ञांचा ठायी ईश्वरबुद्धी आली. मग बाइसांनी ओटा झाडून चांगले आसन रचले. सर्वज्ञ आसनावर बसले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. चरणोदक घेतले. चांगल्या प्रकारची पूजाद्रव्ये आणली. पूजावसर केला. दीप लावून आरती केली, पाच दंडवते घातली. त्यानंतर चांगला उपहार तयार केला आणि तेव्हापासून बाइसा सर्वज्ञांचे सेवादास्य करू लागली. त्या दररोज तिन्हीही पूजावसर येथे करीत असत. (पू. ली. १०७, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) हंसराजाला स्थिती देणे. (पू. ली. १०८) २) उपाध्यांना तांबोळाचा प्रसाद देणे. (पू. ली. ११८)