स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 12
-
पैठण
काष्ठाच्या शास्त्रमठातील स्थान (१)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अनुपदेवाच्या गुंफेतील आसन स्थान देवळाच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख देवळात ही पाच स्थाने आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे काष्ठाचा शास्त्रमठ होता.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
येथील प्रत्येक स्थान कोणत्या लीळेचे आहे, हे सांगता येणार नाही. लीळाचरित्रामध्ये येथील एक लीळा आलेली आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना गणपत मठी अवस्थान असताना दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहुड झाल्यानंतर ते येथे आले. सोबत देइभागवत होते. शास्त्रमठामध्ये संन्यासी वेदान्त वाचत होते. सर्वज्ञ आलेले पाहून "एइजोजी एइजोजी" म्हणून संन्यासी उठून उभे राहिले. देइभागवतांनी आसन घातले. सर्वज्ञ आसनावर बसले. मग संन्याशांना विचारले, "हे आपण काय वाचत आहेत?" संन्यासी म्हणाले, "जी जी हे वेदान्त" सर्वज्ञांनी विचारले, "वेदान्तामध्ये कोणत्या विषयाचे प्रतिपादन केले आहे?" संन्यासी म्हणाले, "आत्म्याचे प्रतिपादन केलेले आहे." सर्वज्ञ म्हणाले, "ते कसे?" मग संन्यासी बोलू लागले. सर्वज्ञ म्हणाले, "आत्मा काय असा आहे? तो असा आहे की," म्हणून सर्वज्ञांनी त्यांना निरूपण केले. नंतर सर्वज्ञांच्यापासून सर्व संन्याशांना स्थिती झाली. (उ. ली. ४७५)