स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
नागापूर
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नागापूर हे गाव, अहिल्यानगर-मनमाड मार्गावर अहिल्यानगरहून उत्तरेस ७ कि.मी. आहे. अरणगावहून नागापूर (अहिल्यानगरमार्ग) १५ कि.मी. आहे. नागापूरला जाण्यासाठी अहिल्यानगरहून सिटी बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. नागापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
नागापूर एम.आय.डी.सी. विभागात, नागापूर सिटी बस थांब्याच्या पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. आवाराचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. आज हे देऊळ 'श्रीचक्रधर' मंदिर या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्थ काळात जामगावहून नागापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. २९०, स्था. पो.) त्यानंतर ते येथून वांबोरीला गेले.