मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शेंडी (पोखर्डी) · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 अदृश्य शेंडी (पोखर्डी)

जेऊळमार्गी अदृश्य होणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शेंडी हे गाव, अहिल्यानगर-संभाजीनगरमार्गावर अहिल्यानगरहून ईशान्येस ९ कि.मी. आहे. शेंडीला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा तसेच सिटी बस सेवा उपलब्ध आहे. वांबोरी ते शेंडी १६ कि.मी. डोंगरगण ते शेंडी १० कि.मी. नागापूरहून पूर्वेस शेंडी (गजानन कॉलनी, गुप्तवडगाव मार्ग) ८ कि.मी. आहे. नागापूरहून शेंडी (अहिल्यानगरमार्ग) १४ कि.मी. आहे. शेंडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शेंडी गावाच्या उत्तरेस अंदाजे ६०० मीटर अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'श्रीकृष्ण मंदिर' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भिंगारहून डोंगरगणकडे जात असताना शेंडी गावापासून थोड्या अंतरावर आल्यावर तेथे दोन्हीकडे दोन रस्ते जात होते. बाइसांनी सर्वज्ञांना विचारले, 'हे दोन्ही रस्ते कुठे जातात?' सर्वज्ञ म्हणाले, 'हा रस्ता जेऊरला जातो व हा रस्ता डोंगरगणला जातो.' बाइसांचे जेऊरला नातेवाईक होते म्हणून त्यांनी सर्वज्ञांना जेऊरला जाण्याविषयी आग्रह केला. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, 'तिकडे जाण्याची आमची इच्छा नाही.' बाइसांनी जास्तच आग्रह केला. म्हणून सर्वज्ञ येथे असलेल्या रिंगणणीच्या झाडाखाली अदृश्य झाले. सर्वज्ञ अदृश्य झाल्याचे पाहून बाइसा बेशुद्ध होऊन खाली पडल्या. मग सर्वज्ञ प्रगट झाले. त्यांनी बाइसांना सावध करून उठविले आणि सांगितले, "असा आग्रह पुन्हा कधीही करू नका." यावर सर्वज्ञांनी क्षिराब्धि गमनाची लीळा सांगितली. मग सर्वज्ञ येथून माळवीपिंपळगावला गेले. (पू. ली. ३६३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने