स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
आरोगणा
माळवी पिंपळगाव
घोळाणा आरोगण करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माळवी पिंपळगाव शेंडीहून उत्तरेस ५ कि.मी. व अहिल्यानगरहून १४ कि.मी. आहे. वांबोरी ते पिंपळगाव ११ कि.मी. आहे. पिंपळगाव येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
पिंपळगावपासून आग्नेयेस दीड कि.मी. व पिंपळगाव एस.टी. बस थांब्यापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर तळ्याच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात (खालील) तथा पश्चिमाभिमुख देवळात (वरील) हे स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रानमळा होता.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शेंडीहून येथे आले. त्यांना येथे आसन झाले. मग त्यांनी येथे घोळाणा आरोगण केला. (पू. ली ३६४, स्था. पो.) त्यानंतर ते येथून डोंगरगणला गेले. विशेष माहिती : हे स्थान सन १९१८ साली इंग्रजांनी पिंपळगावाजवळ निर्माण केलेल्या तळ्याच्या पाण्यामध्ये गेले होते. त्यानंतर त्यावर खूप गाळ बसलेला होता. सुमारे ९४ वर्षे हे स्थान गाळातच होते. इ. श्री. अतुलमुनि महानुभाव (वांबोरी) यांच्या सतत तीन वर्षांच्या अथक परिश्रमामुळे सोमवार दि. १४ मे २०१२ रोजी हे स्थान उपलब्ध झाले.