स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
धार/आसन
डोंगरगण
धार अवलोकणे तथा आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंगरगण हे गाव अहिल्यानगर-वांबोरी मार्गावर अहिल्यानगरहून उत्तरेस १९ कि.मी. व वांबोरीहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. पिंपळगावहून उत्तरेस डोंगरगण ५ कि.मी. आहे. डोंगरगणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान डोंगरगण गावाच्या वायव्येस अंदाजे २०० मीटर अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात महादेवाच्या देवळाच्या नैऋत्येस डोंगराच्या कपारीला लागून आहे. स्थानावर चारी बाजूंनी उघडे असे लहान देऊळ आहे. खोऱ्यात जाताना पश्चिम बाजूच्या उत्तराभिमुख ४२ पायऱ्या उतरून खाली जाणे व डाव्या बाजूस वळणे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात माळवीपिंपळगावहून डोंगरगणला आले. प्रथम त्यांना पापविनाशनीच्या देवळात थोडा वेळ आसन झाले. त्यानंतर ते येथे आले. पाण्याची धार अवलोकन केली. मग त्यांना आसन झाले. (पू. ली ३६५, स्था. पो.) त्यानंतर सर्वज्ञ येथून वांबोरीला गेले.