स्थान - T:राहुरी D:अहिल्यानगर
अवस्थान व वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वांबोरी हे गाव, राहुरी ते पांढरीचा पूल या मार्गावर राहुरीहून आग्नेयेस १७ कि.मी. व पांढरीच्या पुलापासून वायव्येस १२ कि.मी. आहे. (राहुरी हे गाव नगर-मनमाड मार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-संभाजीनगरमार्गावर आहे.) डोंगरगण ते वांबोरी ६ कि.मी. अहिल्यानगर ते वांबोरी २५ कि.मी. बेलापूर ते वांबोरी ३७ कि.मी. वांबोरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानापासून एक कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रमही आहे. वांबोरी हे दौंड-मनमाड लोहमार्गावरील नगर व राहुरी मधील रेल्वे स्थानक आहे. वांबोरी रेल्वेस्थानकापासून वांबोरी गाव ६ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वांबोरी गावाच्या दक्षिणेस अंदाजे ४०० मीटर अंतरावर कर्परा नदीच्या पश्चिम काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे दक्षिणेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान आहे. आज हे देऊळ श्रीकृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते.