स्थान - T:राहुरी D:अहिल्यानगर
स्थान क्र. 6
आसन
वांबोरी
आसन स्थान (लहान मंदिर - पश्चिम विभाग)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वांबोरी हे गाव, राहुरी ते पांढरीचा पूल या मार्गावर राहुरीहून आग्नेयेस १७ कि.मी. व पांढरीच्या पुलापासून वायव्येस १२ कि.मी. आहे. (राहुरी हे गाव नगर-मनमाड मार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-संभाजीनगरमार्गावर आहे.) डोंगरगण ते वांबोरी ६ कि.मी. अहिल्यानगर ते वांबोरी २५ कि.मी. बेलापूर ते वांबोरी ३७ कि.मी. वांबोरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानापासून एक कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रमही आहे. वांबोरी हे दौंड-मनमाड लोहमार्गावरील नगर व राहुरी मधील रेल्वे स्थानक आहे. वांबोरी रेल्वेस्थानकापासून वांबोरी गाव ६ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मंदिराच्या पश्चिम विभागी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू डोंगरगणहून आल्यावर प्रथम बाइसा देऊळ झाडण्यासाठी गेल्या. तेव्हा तेथे खूप डास होते. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, 'जी जी येथे खूप डास आहेत.' सर्वज्ञ म्हणाले, 'दरवाजा लावून लिंबाच्या काड्यांचा धूर करा, म्हणजे डास निघून जातील.' त्याप्रमाणे बाइसांनी दरवाजा लावून लिंबाच्या काड्यांचा धूर केला. देऊळ झाडले, तोपर्यंत सर्वज्ञ येथे बसलेले होते. (पू. ली. ३६७, स्था. पो. उ. सा. खा. द. प्रत)