मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वांबोरी · राहुरी · अहिल्यानगर

स्थान - T:राहुरी D:अहिल्यानगर

स्थान क्र. 7 वैराग्य कथन वांबोरी

मळेसंदी, महात्मेया वैराग्य कथन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वांबोरी हे गाव, राहुरी ते पांढरीचा पूल या मार्गावर राहुरीहून आग्नेयेस १७ कि.मी. व पांढरीच्या पुलापासून वायव्येस १२ कि.मी. आहे. (राहुरी हे गाव नगर-मनमाड मार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-संभाजीनगरमार्गावर आहे.) डोंगरगण ते वांबोरी ६ कि.मी. अहिल्यानगर ते वांबोरी २५ कि.मी. बेलापूर ते वांबोरी ३७ कि.मी. वांबोरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानापासून एक कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रमही आहे. वांबोरी हे दौंड-मनमाड लोहमार्गावरील नगर व राहुरी मधील रेल्वे स्थानक आहे. वांबोरी रेल्वेस्थानकापासून वांबोरी गाव ६ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पश्चिम विभागीच्या आसन स्थानापासून पूर्वेस १७ फूट अंतरावर मंदिराच्या पूर्व विभागी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: राहुरी | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणाला जात असताना येथे उभे राहिले. दक्षिणेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस दोन मळ्यांमध्ये एक संन्यासी महात्मा उघडा भर थंडीमध्ये उभा होता. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, 'महात्मा किती विरक्त आहे! भर थंडीमध्ये उघडा उभा आहे!' यावर सर्वज्ञांनी, या महात्म्याचे वैराग्य विषयासाठी आहे, याचा खुलासा केला. (पू. ली. ३६८, स्था. पो.) पूर्वार्धातील ३ दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून सोनई ला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते तेथून आव्हाण्याला गेले .

जवळील इतर स्थाने