मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भिंगार · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 अवस्थान स्थान भिंगार

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भिंगार हे गाव, अहिल्यानगर-पाथडी मार्गावर अहिल्यानगरहून पूर्वेस ३ कि.मी. आहे. भिंगारला जाण्यासाठी अहिल्यानगरहून सिटी बस सेवा तथा एस.टी. बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. वांबोरीहून भिंगार (नगरमार्ग) २८ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भिंगार गावाच्या उत्तर विभागी ब्राह्मण गल्लीत तीन नळाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात एकदा असे एकूण दोन वेळा भिंगार येथे आले. ते पूर्वार्धात अरणगावहून भिंगारला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी १५ दिवस वास्तव्य होते. (पू. ली. १६०, तू. प्र. स्था. पो.) व उत्तरार्धातही अरणगावहूनच भिंगारला आले. त्या वेळी त्यांचे येथे २० दिवस वास्तव्य होते. (उ. ली. २८१, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) भाइदेवाची बोरे आरोगण करणे (पू. ली. ३५७) २) भाइदेवाने आणलेले चणे आरोगण करणे (पू. ली. ३५८) ३) देमाइसाला ज्ञान, भक्ती, वैराग्य निरूपण करणे (पू. ली. ३५९) ४) देमाइसाला प्रतीती पंथ व विश्वास पंथ निरूपण करणे. (पू. ली. ३६०, ३६१) ५) खेडगोईना समुद्राचा दृष्टांत निरूपण करणे. (उ. ली. २८३)

जवळील इतर स्थाने