मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भिंगार · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 - भिंगार

साधा, लहामाइसा, रत्नमाणिका भेटी स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भिंगार हे गाव, अहिल्यानगर-पाथडी मार्गावर अहिल्यानगरहून पूर्वेस ३ कि.मी. आहे. भिंगारला जाण्यासाठी अहिल्यानगरहून सिटी बस सेवा तथा एस.टी. बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. वांबोरीहून भिंगार (नगरमार्ग) २८ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून उत्तरेस ६ फूट २ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे बसलेले होते. त्या वेळी साधा, लहामाइसा, रत्नमाणिका या तिघी जणी अरणगावहून आल्या. आल्यावर त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले. लहामाइसाने व रत्नमाणिकाने श्रीकंठी फुलांच्या माळा घातल्या. आसनावर विडे व गुळाच्या लहान ढेपा ठेवल्या. साधाने फक्त फुलांची माळ घातली व विडा अपर्ण केला. सर्वज्ञ साधाला म्हणाले, 'यांनी आम्हाला गुळ अपर्ण केला. तुम्ही का केला नाही?' साधा म्हणाली, 'वाटेने येताना, एके ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यास गेले होते. गुळाच्या तीन ढेपा ओसरीवर ठेवल्या होत्या. तेव्हा तेथे एक वासरू आले. त्याने त्यातील एक ढेप खाल्ली. मीच दैवहीन आहे. तेव्हा माझ्याच वाट्याची ढेप खाल्ली म्हणायची.' सर्वज्ञ म्हणाले, 'साधे हो, तुम्ही दैवहीन नाही. आम्ही तुम्हाला गुळ देतो, तो तुम्ही आम्हाला अपर्ण करा.' साधा म्हणाली, 'देवाचेच देवाला कसे काय अपर्ण करावयाचे?' सर्वज्ञ म्हणाले, 'जीवाजवळ आहे तरी काय? हे सर्व देवाचेच आहे.' मग सर्वज्ञांनी साधाला ओंजळभर गुळ दिला. साधाने तो गुळ सर्वज्ञांना अपर्ण केला. (उ. ली. २८१, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने