मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भिंगार · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 आसन भिंगार

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भिंगार हे गाव, अहिल्यानगर-पाथडी मार्गावर अहिल्यानगरहून पूर्वेस ३ कि.मी. आहे. भिंगारला जाण्यासाठी अहिल्यानगरहून सिटी बस सेवा तथा एस.टी. बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. वांबोरीहून भिंगार (नगरमार्ग) २८ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस ५ फूट ११ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे बसलेले होते. त्या वेळी लक्ष्मीदेव व भाइदेव यांची माता या दोघांना घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आली. दंडवत घातले. श्रीचरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि लक्ष्मीदेवाची भूतबाधा दूर होण्याविषयी विनंती केली. सर्वज्ञांनी लक्ष्मीदेवाला हाक मारली; परंतु लक्ष्मीदेव पळाले आणि नारायणाच्या देवळावर चढले. मग त्यांनी पाण्याच्या मोरीमध्ये तोंड खूपसले. सर्वज्ञ म्हणाले, 'लक्ष्मीदेव सम्मुख असते, तर त्यांचे पीसे दूर झाले असते.' नंतर फक्त भाइदेवच सर्वज्ञांच्या संनिधी राहिले. (पू. ली. १६०, तू. प्र.)

जवळील इतर स्थाने