मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भिंगार · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 4 लघुनीती भिंगार

भाइदेवाशी लघुनीती करवणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भिंगार हे गाव, अहिल्यानगर-पाथडी मार्गावर अहिल्यानगरहून पूर्वेस ३ कि.मी. आहे. भिंगारला जाण्यासाठी अहिल्यानगरहून सिटी बस सेवा तथा एस.टी. बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. वांबोरीहून भिंगार (नगरमार्ग) २८ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस ७ फूट ८ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
भाइदेव बालवयाचे होते. ते रात्री बाइसांच्या पुढे झोपायचे. त्यांना रात्री लघवीला लागली की ते सर्वज्ञांना म्हणत, 'मुनिदेव हो, मुतू' बाइसा म्हणायच्या, 'बटीका उठ, मी तुला बाहेर घेऊन जाते.' परंतु ते उठत नसत. गप्प राहत. मग सर्वज्ञ भाइदेवांना देवळाच्या दरवाजात घेऊन येत. ते सर्वज्ञांचे दोन्ही श्रीकर धरून उभे राहूनच लघवी करीत. त्यामुळे सर्वज्ञांचे श्रीचरण शितोडले जात. नंतर बाइसा सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण करीत. (पू. ली. ३७२ख. प्रत, वि. स्था.पो.क्र. १६२५)

जवळील इतर स्थाने