स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
आसन
वडवाळी
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वडवाळी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून पूर्वेस ६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस ३५ कि.मी. आहे. वडवाळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. पैठण-शहागड मार्गावरील वडवाळी गावाजवळील ओळाच्या पश्चिमेस दीड फर्लांग अंतरावर रस्त्याच्या डाव्या हाताचे वळण येण्यापूर्वी रस्त्याच्या दक्षिण बाजूस स्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वडवाळी गावाच्या पश्चिमेस अंदाजे २०० मीटर अंतरावर ओळाच्या पश्चिम काठी व गोदावरी नदीच्या उत्तर काठी टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बागेश्वराची देवळी होती. हे स्थान पूर्वार्धातील होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू मायगावहून वडवाळीला आले. गावाच्या दक्षिण वेशीच्या पूर्वेच्या लिंबाजवळ त्यांनी अवधूतांस भिक्षा करून येण्यास सांगितले. त्यानंतर ते येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. सर्वज्ञ इंद्रभटांना म्हणाले, "अवधूत भिक्षा करून येईल, तरी तुम्ही आपले नित्यकर्म, संख्या वगैरे करू शका." मग इंद्रभट गंगेवर गेले. (पू. ली. ५७१, स्था.पो.) सर्वज्ञ येथून पैठणला गेले.