स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
मायगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मायगाव, पैठण-शहागड मार्गावरील मायगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते मायगाव फाटा ११.५ कि.मी. शहागड ते मायगाव फाटा २९.५ कि.मी. मायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मायगावच्या दक्षिणेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पश्चिम काठी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे निकळंकाचे देऊळ होते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रात्रीच्या वेळेस नवगावहून मायगावला आले. त्यांना येथील ओट्यावर आसन झाले. चरणक्षाळण, गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग ओट्यावरच पहुड झाला. (पू. ली. ५६८, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून वडवाळीला गेले.