स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
अवस्थान
नवगाव
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस २५ कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव ६ कि.मी. नवगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाकडे जाण्यासाठी वाहन मार्ग आहे. नवगाव बस थांबा व तुळजापूर बस थांबा दरम्यान उत्तर दिशेस रस्ता आहे. नवगाव बस थांबा ते नवगाव स्थान दीड कि.मी. अंतर आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नवगावच्या ईशान्येस एक कि.मी. अंतरावर येरभद्रा ( विंझुगा ) नदीच्या काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील दक्षिण भिंतीलगतचे हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात आंगलेगळ्याणहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. २० दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून मायगावला गेले. (पू. ली. ५५७, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) ब्राह्मणाला स्थिती देणे. (पू. ली. ५६०) २) ब्राह्मणास स्थिती जाण्यास उपाय सांगणे. (पू. ली. ५६१) ३) सापाचे उतटणे करणे. (पू. ली. ५६२) ४) मार्कडाला पांचाळेश्वरला पाठविणे. (पू. ली. ५६३)