स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
चरणचारी
नवगाव
चरणचारी उभे राहणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस २५ कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव ६ कि.मी. नवगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाकडे जाण्यासाठी वाहन मार्ग आहे. नवगाव बस थांबा व तुळजापूर बस थांबा दरम्यान उत्तर दिशेस रस्ता आहे. नवगाव बस थांबा ते नवगाव स्थान दीड कि.मी. अंतर आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून वायव्येस ९ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ आंगलेगळ्याणहून आल्यानंतर देवळाच्या चौकात येथे चरणचारी उभे राहिले. त्यांना ओटा करण्याची प्रवृत्ती होती. ती जाणून भक्तजनांनी ओटा तयार केला. नंतर सर्वज्ञांना ओट्यावर आसन झाले. तोपर्यंत ते येथेच उभे होते. (पू. ली. ५५७)