स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
कथन
नवगाव
ब्रह्मप्रकाशिका कथन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस २५ कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव ६ कि.मी. नवगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाकडे जाण्यासाठी वाहन मार्ग आहे. नवगाव बस थांबा व तुळजापूर बस थांबा दरम्यान उत्तर दिशेस रस्ता आहे. नवगाव बस थांबा ते नवगाव स्थान दीड कि.मी. अंतर आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस ५ फूट ७ इंच अंतरावर आहे. आदित्याचे देऊळ व महालक्ष्मीचे देऊळ या दोन देवळांच्या संदीतील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) एक अवधूत दोन देवळांच्या संदीमध्ये भांग भाजत होता. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. अवधूताला म्हणाले, "आपण काय ब्रह्मप्रकाशिका भाजत आहेत?" अवधूत म्हणाला, 'हो जी.' मग सर्वज्ञांना येथे उकड आसन झाले. (पू. ली. ५५८, स्था. पो.) २) सर्वज्ञांच्यापासून येथे इंद्रभटांना स्थिती झाली. (पू. ली. ५५८)