मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

हिरडपुरी · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 पूजा/आरोगणा हिरडपुरी

प्रातः पूजा तथा आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हिरडपुरी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस २७ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस १४ कि.मी. आहे. नवगाव ते हिरडपुरी ११ कि.मी. हिरडपुरीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवगाव-हिरडपुरी मार्गावरील टाकळी अंबड येथे महानुभाव मठ आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हिरडपुरी गावाच्या नैऋत्येस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर ओळाच्या पश्चिमेस व गोदावरी नदीच्या उत्तरेस श्री. अंबादास रामराव थोरे यांच्या शेतात उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ब्रह्मनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. हे स्थान आंगलेगव्हाणच्या हद्दीतील आहे; परंतु पूर्वीचे गाव गोदावरी नदीच्या महापुरामुळे ओसाड झाले. सध्या हे स्थान हिरडपुरी गावाच्या हद्दीत असल्यामुळे या स्थानाचा हिरडपुरी येथील स्थानांमध्ये समावेश केला आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात हिरडपुरीहून आंगलेगव्हाणला आले. येथे सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग थोडी विश्रांती घेऊन सर्वज्ञ येथून नवगावला गेले. (पू. ली. ५५६, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने