मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सोनई · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती सोनई

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सोनई हे गाव राहुरी-घोडेगाव मार्गावर राहुरीहून पूर्वेस २३ कि.मी. आहे. (राहुरी, नगर-मनमाड मार्गावर आहे व घोडेगाव, नगर-संभाजीनगरमार्गावर आहे) सोनईला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सोनई गावाच्या पश्चिम विभागी समाज केंद्र शाळा क्र. १ च्या जवळ वनदेवाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वांबोरीहून सोनईला आले. त्यांना प्रथम चौकात आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा झाला व येथेच एक रात्र मुक्काम झाला. (पू. ली. ३६९, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून कानडगावला गेले.

जवळील इतर स्थाने