मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलपिंपळगाव · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 आसन बेलपिंपळगाव

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलपिंपळगाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील बेलपिंपळगाव फाट्यापासून उत्तरेस २ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते बेलपिंपळगाव फाटा २० कि.मी. नेवासा ते बेलपिंपळगाव फाटा ११ कि.मी. बेलपिंपळगावला जाण्यासाठी नेवासा येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जुन्या घोगरगाव ते बेलपिंपळगाव ५ कि.मी. आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पिंपळगाव सुरेगाव रस्त्यावर पिंपळगावापासून पूर्वेस एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
डोंबेग्राम येथे रात्री आरोगणा झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अंगणामध्ये शतपावली करीत होते. शुभ चांदणे पडले होते. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, "अशा चांदण्यामध्ये ग्रामांतर करण्यास काय हरकत आहे?" "काही हरकत नाही." भक्तजन म्हणाले. मग बाइसांना तयारी करावयास सांगितले. सर्वज्ञ सर्व भक्तजनांसह डोंबेग्रामहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. त्यानंतर ते येथून नेवाशाला गेले. (उ. ली. २२१, स्था. पो.) यापूर्वीही डोंबेग्राम येथे असताना सर्वज्ञ एक वेळ चाचरमुदी येथे येऊन गेलेले आहेत. (उत्तरार्ध लीळा १६५)

जवळील इतर स्थाने